नाशिकमध्ये दोन बिबट्यांचा धुमाकूळ, एक जेरबंद

बिबट्या जेरबंद,www.pudhari.news

सिडको, नाशिक ; नाशिकच्या सिडको परिसरात दोन बिबट्यांनी पहाटेपासून धुमाकूळ घातला आहे. पहिला बिबट्या सावतानगर येथे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये दिसला, तर दुसरा गोविंदनगर परिसरात धुमाकूळ घालतो आहे.

यातील सावतानगर येथे दिसलेला बिबट्या रायगड चौक येथे एका घरात शिरला होता. या  बिबट्याला वनविभाग पथक व पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी जेरबंद करण्यात यश आले आहे. तब्बल दोन तास या बिबट्याला रेस्क्यू करण्याचा थरार रंगला. मात्र, गोविंदनगर येथील बिबट्याला रेस्क्यू करण्याचे काम सुरु आहे. नागरी वस्तीस बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

The post नाशिकमध्ये दोन बिबट्यांचा धुमाकूळ, एक जेरबंद appeared first on पुढारी.