नाशिकमध्ये नगरसेवकांची चमकोगिरी! काहीही संबंध नसताना लसीकरणाबाबत शहरभर होर्डिंग्स

नाशिक : लसीकरणाच्या नावाखाली नाशिक शहरात नगरसेवकांची चमकोगिरी सुरू आहे. एकीकडे नागरिकांना लस उपलब्ध होत नाही आणि दुसरीकडे मोफत लसीकरणाचे अनधिकृत होर्डिंग्ज शहरभर लावले जात असून शहर विद्रुपीकरणात भर पडत आहे. हे होर्डिंग नाशिक शहरात जवळपास प्रत्येक प्रभागात बघायला मिळत आहेत.

शासनाकडून मिळणाऱ्या लशीचे नाशिक महानगर पालिका प्रशासनाकडून कोरोना लसीकरण केले जाते. या शृंखलेत नगरसेवकांचा थेट सबंध कुठेच बघायला मिळत नाही. प्रत्येक प्रभागत लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांनी लसीकरण केंद्राबाहेर आणि वार्डात फलकबाजी करण्यास सुरुवात केली.

नाशिक महानगरपालिकाची निवडणूक 8 ते 9 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत नाव पोहचवण्यासाठी नगरसेवकामध्ये अक्षरशः स्पर्धा लागली आहे. मात्र काहीही संबंध नसताना लसीकरणावरुन सर्वच स्तरातून  सुरु असलेल्या चमकोगिरीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

शहराचे विद्रूप करणाऱ्या या फलकबाजीला मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी चाप लावला आहे. शहरात जिथे अनधिकृत होर्डिंग्ज दिसतील त्या काढण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असून अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना दणका द्यायला सुरुवात झाली आहे.

या आधीही मनपा आरोग्य विभागाच्या माध्यमातून रॅपिड टेस्ट केली जात होती. त्या कामातही नगरसेवक लुडबूड करत स्वतः क्रेडिट घेत होते. आता पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चमकोगिरी सुरू झाल्याने शहरात नगरसेवकांच्या  कामापेक्षा होर्डिंग्जचीच चर्चा अधिक होत आहे.