नाशिकमध्ये पुन्हा आयकर विभागाचे छापे, आता रडारवर ‘उद्योजक’

नाशिक : नाशिकमध्ये आयकर विभागाने पुन्हा एकदा धाड टाकल्याचे समजते आहे. गेल्या महिन्यात शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आता नाशिक शहरातील एका नामाकिंत कंपनीत आयकर विभागाने छापा टाकला असून कारवाई सुरु असल्याचे कळते आहे.

गेल्या महिन्यात सलग चार दिवस आयकर विभागाचे अधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकून होते. तब्बल 3 हजार कोटीहून अधिक गैरव्यवहार केल्याने नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकरने छापेमारी केली होती. अशातच आता पुन्हा आयकर विभागाने नाशिकमध्ये धाड टाकल्याचे समजते आहे. बांधकाम व्यावसायिकांनतर आता उद्योजक आयकर विभागाच्या रडारवड असल्याचे दिसते आहे.

दरम्यान आज, नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) तर्फे आयोजित निमा पॉवर २०२३ च्या उद्घाटनासाठी  उद्योगमंत्री उदय सामंत हेही नाशिकमध्ये होते. उद्योगमंत्री नाशिकमध्ये असतानाच उद्योजकांवर अशी छापेमारी झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून उद्योजकांचे दाबे दणाणले आहेत. या कारवाईनंतर नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

The post नाशिकमध्ये पुन्हा आयकर विभागाचे छापे, आता रडारवर 'उद्योजक' appeared first on पुढारी.