नाशिकमध्ये पेट्रोलपंपावर काम करणा-या महिलेवर कोयत्याने हल्ला

नाशिक : पुढारी ऑनलाइन  

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या जाधव पेट्रोलपंपावरती काम करत असलेल्या महिलेवर एकाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे.  पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमे-यात हा सर्व प्रकार कैद झाला असून भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ पसरली आहे.

पीडीत महिलेने दिलेल्या माहितीनुसार, जुबेदा युसुफ खान (37) या महिलेवर तिच्यासोबत मैत्री असलेल्या प्रमोद प्रकाश गोसावी याने हा हल्ला केला. जुबेदा खान व प्रमोद गोसावी या दोघांमध्ये एकवर्षापासून मैत्री होती. मात्र दरम्यान एका बलात्काराच्या गुन्ह्यात प्रमोद गोसावीस अटक झाली. प्रमोद तुरुंगातून सुटुन आल्यानंतर  महिलेने त्याच्यासोबत मैत्री ठेवण्यास नकार दिल्याने त्याच रागातून प्रमोद याने हा हल्ला केला. पेट्रोलपंपावर जाऊन त्याने महिलेवर कोयत्याने सपासप वार केले. अशी माहिती पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना दिली.

The post नाशिकमध्ये पेट्रोलपंपावर काम करणा-या महिलेवर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.