नाशिकमध्ये बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात ; दुचाकीस्वाराचा मृत्यू

nashik accident

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने ही बस डिव्हायडर तोडून थेट दुसऱ्या लेन मध्ये घुसली व दोन दुचाकींना धडकली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेळगाव ढगा परिसरात हा भीषण अपघात झाला.  खासगी वाहतूक करणारी बस त्र्यंबकेश्वरहुन देवदर्शन करून नाशिककडे निघाली. बस बेळगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुलजवळ आली असता बसचे अचानक टायर फुटले. त्यानंतर बस डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली.

यावेळी नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना बसने जोरदार धडक दिली व बस झाडावर जावून आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

The post नाशिकमध्ये बसचे टायर फुटल्याने भीषण अपघात ; दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.