नाशिकमध्ये बॅनर युद्ध; सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे फोटो व नाव वगळले

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिकमध्येही बॅनर युद्ध रंगल्याचे पाहायला मिळते आहे. छगन भुजबळ, अजित पवार यांच्या समर्थकांनी शरद पवार यांचे फोटो असलेले बॅनर लावले आहेत.

राज्यात राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिपदाची खलबते सुरू असतानाच नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनर बाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचा फोटो नसल्याने चर्चेचा विषय झाला आहे. सुप्रिया सुळे व जयंत पाटील या दोघांचेही फोटो व नाव या बॅनरवर नसल्याने या बॅनरची चागंलीच चर्चा रंगली आहे.  अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.

हेही वाचा : 

 

The post नाशिकमध्ये बॅनर युद्ध; सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे फोटो व नाव वगळले appeared first on पुढारी.