नाशिकमध्ये ‘ब्रेक दे चेन’चा सकारात्मक परिणाम; कोविड रुग्णसंख्या वाढूनही घटतोय ‘पॉझिटिव्ह’ दर

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेचा परिणाम दिसू लागला आहे. आठवडाभरात रुग्णांची संख्या वाढली असली, तरी रुग्ण पॉझिटिव्हिटी दर मात्र घटला आहे. 

महिन्यात नऊपट वाढ 
जिल्ह्यातील गेल्या महिन्याभरातील कोरोनावाढीच्या रुग्णवाढीचा विचार केला तर ९ मार्च ते ९ एप्रिल चार हजार ४०० रुग्‍णसंख्येवरून ही संख्या ३६ हजार २३५ इतकी झाली आहे. एका महिन्यात कोरोना रुग्णसंख्यावाढीचा वेग नऊपट इतका आहे. नाशिक जिल्ह्यात २४ मार्चला कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या २४ हजार ९५० होती. ४ एप्रिलला त्यात वाढ होऊन रुग्णसंख्या ३० हजार ४७१ इतकी झाली आहे. रोज सरासरी साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहर व जिल्ह्यात २० हजारांहून अधिक रुग्ण होम क्वारंटाइन आहे. २५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान १६४ मृत्यू झाले. रोज सरासरी १७ ते १८ या सरासरीने कोरोना मृत्यूंची संख्या आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

पॉझिटिव्हिटी दरात घट 
विभाग ५ एप्रिल ९ एप्रिल 
नाशिक शहर ३८ टक्के २८.७७ टक्के 
नाशिक ग्रामीण ४४ टक्के ३३ टक्के 
मालेगाव ३९ टक्के २० टक्के 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

रुग्ण वाढूनही पॉझिटीव्हीटी दर घटतोय  

ब्रेक द चेन मोहिमेत नऊ अत्यावश्यक सेवा, सहा आर्थिक सेवांचा अपवाद वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्यात आल्या असून, शनिवारी व रविवारच्या वीकेंड लॉकडाउनमुळे रस्त्यावरील गर्दी कमी होऊन संसर्ग रोखण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले. रुग्णांच्या संख्येत पॉझिटिव्हिटी दर मात्र घटतो आहे. हे तेवढे समाधानाचे चित्र आहे.