नाशिकमध्ये ‘ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी; नागरिकांमध्ये गांभीर्याअभावी कोरोनाचा धोका कायम

नाशिक : राज्‍यासह जिल्‍हाभरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, राज्‍य शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेताना कठोर निर्बंध लागू केले आहेत. मंगळवार (ता.६) पासून या निर्बंधांच्‍या अंमलबजावणीला सुरवात झाली. शहर परिसरातील रस्‍त्‍यांवर मात्र वाहनांमुळे स्‍थानिक बाजाराची रहदारी कायम होती. नागरिकांमध्ये परीस्‍थितीच्‍या गांभीर्याअभावी कोरोनाचा धोका कायम असल्‍याची स्‍थिती आहे. 

नागरिकांनी परिस्थिती गांभीर्याने घ्यावी! 

राज्‍य शासनाच्‍या निर्बंधांची जिल्‍हा प्रशासनाने स्‍थानिक पातळीवर अंमलबजावणी केली आहे. त्‍यानुसार आता जीवनावश्‍यक वस्‍तू व सेवा वगळता अन्‍य दुकाने येत्‍या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. शहरात उन्‍हाची झळ वाढत चाललेली असताना व कोरोनाच्‍या फैलावाचा धोका कायम असताना काही नागरिकांमध्ये याबाबत गांभीर्य नसल्‍याची स्‍थिती आहे.

प्रशासनाने अधिक कठोर व्हावे..

लागू केलेल्‍या निर्बंधांचा समाजातील ठराविक वर्गाकडून काटेकोर पालन केले जात असताना, दुसरीकडे काहींकडून जावीणपूर्वक नियम भंग करण्याचा प्रयत्‍न केला जातो आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्‍त्‍यांसह उपनगरीय भागांमध्येही रहदारी कायम बघायला मिळाली. प्रशासकीय यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना केल्‍या जात आहेत. सध्याच्‍या अडचणीच्‍या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी शहर परीसरात फेरफटका मारणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जाते आहे. 

दिवसभरातील क्षणचित्रे…

- दुकाने बंद असल्‍याने बाजारपेठा ओस पडल्या आहेत.  

- दुकान उघडणाऱ्या व्‍यावसायिकांवर दंडात्‍मक कारवाई करण्यात आली.

- अडगळीच्‍या ठिकाणी नागरीक, तरुणांच्या टोळक्‍यांनी मांडले ठाण मांडले    होते. 

- उपनगरीय भागांमध्येही काही प्रमाणात रहदारी सुरुच.