नाशिकमध्ये भाजपचे वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन; केली वीज बिलांची होळी

नाशिक : लॉकडाऊन काळात रिडींग न घेता नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या वाढीव विज बिले मागे घेण्यात यावी या मागणीसाठी व राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आश्‍वासन देवूनही वाढीव बिले वाटप केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज शहरात विविध भागात वीज बील होळी आंदोलन केले. 

रविवार कारंजा येथे आमदार प्रा. देवयानी फरांदे व शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी वीज बिलांची होळी करून आंदोलन केले. लॉकडाऊनच्या रिडींग न घेता वीज वितरण कंपनीने सरासरी बिले नागरिकांना पाठविली. परंतू लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर नागरिकांना मोठ्या रक्कमेची बिले हाती पडतं आहे. महाविकास आघाडी सरकारने शंभर युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती परंतू त्यावर कुठलीही कार्यवाही न होता नागरिकांना अव्वाच्या सव्वा दराने वाढीव विज बिले देण्यात आली. नागरिकांच्या हातात बिले टेकवताना भरण्याची सक्ती देखील केली जात असल्याने भाजपतर्फे बिलांची होळी करण्यात आली. 

हेही वाचा>> नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस

थकबाकीसाठी वीज जोडणी तोडू ​नये

रविवार कारंजा येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार फरांदे,शहराध्यक्ष श्री पालवे, मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी,नगरसेविका स्वाती भामरे, राजेंद्र महाले, महिला मंडल अध्यक्ष ललिता बिरारी, शिवा जाधव, मोहन गायधनी, संगीता जाधव आदींनी आंदोलन केले. मार्च ते जून महिन्यातील आर्थिक दुर्बल व मागासवर्गिय घटकातील नागरिकांची बिले पुर्णता माफ करावी व महाविकास आघाडी सरकारने पाच हजार कोटी रुपये वीज बिलांच्या पोटी अदा करावे, थकबाकीसाठी वीज जोडणी तोडू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 
 

हेही वाचा>> खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर? बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रका

सातपूरला बिलांची होळी 

सातपुर विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट व सातपूर कॉलनी बसस्थानक येथे युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव बोडके, गौरव सहानी, सातपूर मंडल सरचिटणीस चारुदत्त आहेर यांनी आंदोलन केले. नगरसेवक दिनकर पाटील, शहर भाजपा उपाध्यक्ष अमोल पाटील, रुपेश पाटिल, संदेश गांगुर्डे यांनी शिवाजी नगर येथे आंदोलन केले. 

सिडकोत आंदोलन 

आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वात सिडकोत वीज बीलांची होळी करण्यात आली. माऊली लॉन्स, हेडगेवार चौक, सिम्बॉयसिस कॉलेजवळील महावितरण कार्यालया जवळ आंदोलन झाले. जगन पाटील, सिडको मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, नगरसेविका प्रतिभा पवार, अलका अहिरे, कावेरी घुगे, छाया देवांग, राकेश दोंदे, निलेश ठाकरे, आबा पवार, दिनेश मोडक, राकेश ढोमसे, डॉ. भालचंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.