नाशिकमध्ये भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन

अजित पवार पुतळा दहन, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष नाशिक महानगरतर्फे रविवार कारंजा येथे सोमवारी (दि. २) जाहीर निषेध करून अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

विधानसभेत अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्य रक्षक होते, अशा पद्धतीचे वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी ४० दिवस अत्याचार सहन केला, अखेर मुत्यू पत्कारला पण धर्म सोडला नाही अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अजित पवार यांनी केलेले हे विधान निषेधार्ह असल्याचा संताप भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. अजित पवार थोडीतरी लाज बाळगा…, धिक्कार असो धिक्कार असो अजित पवारांचा धिक्कार असो, अजित पवार राजीनामा द्या…अशा अनेक घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

आंदोलनाप्रसंगी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, काशीनाथ शिलेदार, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके, सुनील देसाई, भास्कर घोडेकर, देवदत्त जोशी, ॲड. अजिंक्य साने, स्वाती भामरे, प्रतीक शुक्ल, योगेश हिरे, प्रा. कुणाल वाघ, तुषार भोसले, सुजाता करजगीकर, रोहिणी नायडू, नंदकुमार देसाई, महेश सदावर्ते, वसंत उशीर, विजय बनछोडे, धनंजय पळसेकर, अनिल ताजनपुरे, ॲड. श्याम बडोदे, फिरोज शेख, पवन उगले, ऋषिकेश डापसे, अतुल क्षीरसागर, सुमन विश्वकर्मा, रूपाली मर्चडे, शिल्पा पारनेरकर, कांचन खाडे, उदय जोशी, सुनील खोडे, अहमद काझी, सचिन कुलकर्णी, रफिक शेख, चित्रेश वस्पटे, सोनाली कुलकर्णी, हीना शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.