नाशिकमध्ये मटका खेळणारे 9 संशयित ताब्यात ; अंबड पोलिसांची सिडको हद्दीत धाड

crime,www.pudhari.news

नाशिक/ सिडको : अंबड पोलिसांनी सिडको हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून मटका खेळणार्‍या नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्ती चौक व शिवाजी चौक परिसरात मटका खेळत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकत मटका खेळणार्‍या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून मटका खेळण्याच्या पावत्या हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मटका खेळणारे 9 संशयित ताब्यात ; अंबड पोलिसांची सिडको हद्दीत धाड appeared first on पुढारी.