नाशिकमध्ये मध्यरात्री रंगला बिबट्याचा थरार….

नाशिकमध्ये रंगला बिबट्याचा थरार,www.pudhari.news

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चहुबाजूंनी बिबट्याचे साम्राज्य विस्तारले आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक दहशतखाली आहेत. अशातच काल वडाळा रोडवरील आयेशा नगर येथे रात्री दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका बंगल्यातच शिरकाव केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सगळीकडे घबराट उडाली…

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारात एका बंगल्याच्या वाहन तळातून या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले अन् सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला….

नाशिक शहरातील सह्याद्री हॉस्पीटलच्या परिसरास रात्री साडे दहाच्या सुमारास बिबट्या दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाला व बिबट्या रेस्क्यू करण्याचे काम सुुरु करण्यात आले होते. यावेळी बिबट्याचा हा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

लोकांच्या गोंधळामुळे बिबट्या घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता. बिबट्याच्या वावरामुळे महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर रात्री बाराच्या सुमारास बिबट्याला इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मध्यरात्री रंगला बिबट्याचा थरार.... appeared first on पुढारी.