नाशिकमध्ये मनसेचे ‘पदाधिकारी आपल्या दारी’

मनसे पदाधिकारी आपल्या दारी,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पदाधिकारी आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात असून, या अंतर्गत शहर पदाधिकाऱ्यांकडून नाशिकरोड परिसरातील स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन समस्यांबाबत संवाद साधला जात आहे.

संबधित बातम्या :

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिकरोड परिसरात पदाधिकाऱ्यांनी संतोष पिल्ले, प्रमोद साखरे, गोकुळ नागरे, रोहन देशपांडे, नितिन पंडित, दत्ता कोठुळे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांनी भेटी देत संवाद साधला. याप्रसंगी लोकसभा संघटक किशोर शिंदे, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, पराग शिंदे, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, शहर अध्यक्ष दिलीप दातीर, सुदाम कोंबडे यांच्यासह शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, साहेबराव खर्जुल, बंटी कोरडे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश घुगे, विद्यार्थी सेनेचे शशी चौधरी, शाखा अध्यक्ष कृष्णा पूरकर, भूषण बछवाल, तुषार घोडके, किशोर गुंजाळ, सागर घुगे, आदित्य कुलकर्णी, मयूर कुकडे, विल्सन सालवी योगेश शिरसाठ आदी उपस्थित होते.

मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांसह स्थानिक शाखाप्रमुख व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आमच्या अडीअडचणी समजून घेतल्यामुळे पक्षाला निश्चित फायदा होईल.

– प्रमोद साखरे, निरीक्षक, नाशिक पूर्व विधानसभा

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मनसेचे 'पदाधिकारी आपल्या दारी' appeared first on पुढारी.