नाशिकमध्ये मनसेत पदाधिकारी बदलाचा धडाका! आता कोणाची उचलबांगडी? कार्यकर्त्यांचे लक्ष 

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यात नाशिकला आले व गेले. त्यानंतर संघटनापातळीवर बदलाला त्यांनी सुरवात केली. पदाधिकारी बदलाचा धडाका लावल्याने आता कोणाची उचलबांगडी किंवा पदावरून दूर केले जाते याकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

नाशिकमध्ये मनसेत पदाधिकारी बदलाचा धडाका!

शिवसेनेशी जवळीक साधल्याने मध्य विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सचिन भोसले यांना पदावरून हटविण्यात आले. त्यापाठोपाठ मनसे महापालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष भवर यांची पदावरून उचलबांगडी करत नगरसेवक शेवरे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नवीन पदभार दिल्याचे भवर यांनी सांगितले असले तरी गेल्या वर्षाच्या अखेरीस सचिन भोसले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत मनसे संघटनेत फारसे आलबेल नसल्याची तक्रार केली होती.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

मनसे संघटनेत फारसे आलबेल नसल्याची तक्रार

मध्य विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक सचिन भोसले यांना पदावरून दूर केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप भवर यांची पदावरून उचलबांगडी करत नगरसेवक योगेश शेवरे यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्या वेळी भवरही एका गटाचे नेतृत्व करत होते. त्याच कारणामुळे त्यांची उचलबांगडी झाल्याचे बोलले जात आहे. पदाधिकारी बदलाचा धडाका लावल्याने आता कोणाची उचलबांगडी किंवा पदावरून दूर केले जाते याकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर