नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी आता ‘दामिनी मार्शल्स’

दामिनी मार्शल्स, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

शहरातील तरुणी, महिलांची छेडछाड रोखण्यासोबतच अल्पवयीन बेपत्ता मुला- मुलींच्या शोधासाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकांच्या जोडीला दामिनी मार्शल्स पथक तैनात राहणार आहे. या पथकात ११ दुचाकीवरून ४४ महिला पोलिस शहरात गस्त घालणार आहेत. सोमवारी (दि. १४) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पथकाचे उद्घाटन झाले.

पोलिस आयुक्तालय हद्दीतील महिला अत्याचार, गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘दामिनी मार्शल्स’ पथक कार्यान्वित झाले आहे. पथकाच्या उद्घाटनाप्रसंगी ना. भुसे यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, शिवसेना शिदे गटाचे नेते अजय बोरस्ते, पोलिस

उपआयुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, किरणकुमाण, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

निर्भया पथकांकडे अल्पवयीन बेपत्ता मुला-मुलींचा शोध, समुपदेशनासह काही प्रमाणात गुन्हे शोधाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे निर्भयासह दामिनी पथकांना स्वतंत्र्य गणवेश देण्यात आला. निर्भया पथके चारचाकीतून, तर “दामिनी मार्शल्स’ या दुचाकीवरुन गस्त घालतील. दामिनी पथकात फक्त महिला अंमलदार आहेत.

पथकाची कार्यपद्धती

दामिनी मार्शल्स पथकामार्फत महिला, तरुणींची छेडछाड होणाऱ्या ठिकाणांवर गस्त घातली जाणार, शैक्षणिक संस्था, बसस्थानक, बाजारपेठ, वसतिगृहे, मल्टिप्लेक्स, उद्यानांतही पथकांमार्फत नियमित गस्त राहील. टवाळखोरांचा शोध घेत त्यांचे चित्रीकरण करून कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिस व नियंत्रण कक्षाचीही मदत घेतली जाणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी आता 'दामिनी मार्शल्स' appeared first on पुढारी.