नाशिकमध्ये मेजरसह सहकार्‍याला लाच घेताना अटक

लाचखोरांना अटक www.pudhari.news

नाशिकरोड : येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल नाशिक येथील मेजर हिमांशू मिश्रा व सहायक गॅरिसन अभियंता मिलिंद वाडिले यांना कंत्राटदारांकडून लाच घेताना अटक करण्यात आल्याने संरक्षण विभागातील भ्रष्टाचार समोर आला आहे.

सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. याबाबत सीबीआयच्या मुंबई शाखेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस निरीक्षक रंजित कुमार पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाबाबत शुक्रवारी (दि.14) अधिकृत माहिती जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मेजरसह सहकार्‍याला लाच घेताना अटक appeared first on पुढारी.