नाशिकमध्ये ‘या’ भाजपा आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक, भाजप आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जून खरगे यांना कर्नाटकमधील चित्तूर विधानसभेचे भाजप उमेदवार आणि स्थानिक आमदार माणिक राठोड यांनी खर्गे आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी एका फोनद्वारे दिली. त्यापार्श्वभूमीवर राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.

खासदार मल्लिकार्जून खर्गे यांना जीवे मारण्याची धमकी देणे म्हणजे सर्व काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांना मानसिक धक्का पोहोचवणारी घटना असल्याचे निवेदनात म्हटले आहे. देशाच्या विविध भागात अशा प्रकारे गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना नाशिक शहरातही या भाजपा आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशन गाठून निवेदन दिले.

यावेळी शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल, माजी नगरसेवक राहूल दिवे, आशा तडवी, हनीफ बशीर, स्वप्निल पाटील, अल्तमश शेख, स्वाती जाधव, संतोष ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, गौरव सोनार, जावेद इब्राहिम, नंदकुमार कर्डक, जुली डिसोझा, प्रकाश खळे, इसाक कुरेशी, देवेंद्र देशपांडे, सचिन दीक्षित, अमोल मरसाळे, नदीम शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये 'या' भाजपा आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी appeared first on पुढारी.