नाशिकमध्ये युवासेनेतर्फे भाजप व राणे कुटुंबा विरोधात आंदोलन

नाशिक :  भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे युवा सेनेच्या वतीने भाजप आणि राणे कुटुंबियांच्या विरोधात अनोख आंदोलन करण्यात आले.भाजप कार्यलय समोर युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कुत्रे घेत आंदोलन केले.दोन्ही कुत्र्यांच्या गळ्यात नितेश राणे आणि नारायण राणे असे पोस्टर घालण्यात आले.नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील युवासेनेच्या वतीने करण्यात आली होती.राज्यात सध्या गलिच्छ राजकारण केले जात असून वेळोवेळी भाजप आणि राणे कुटुंबीय हे शिवसेनेवर आरोप करून शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आला.  (व्हिडिओ - विक्रांत मते)