नाशिकमध्ये युवासेनेतर्फे भाजप व राणे कुटुंबिय विरोधात अनोखे आंदोलन; कुत्र्यांच्या गळ्यात राणेंचे पोस्टर, पाहा VIDEO

नाशिक : भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे युवा सेनेच्या वतीने भाजप आणि राणे कुटुंबियांच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले.

दोन्ही कुत्र्यांच्या गळ्यात नितेश राणे आणि नारायण राणेंचे पोस्टर

भाजप कार्यलयासमोर युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कुत्रे घेत आंदोलन केले. दोन्ही कुत्र्यांच्या गळ्यात नितेश राणे आणि नारायण राणे असे पोस्टर घालण्यात आले. नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील युवासेनेच्या वतीने करण्यात आली.राज्यात सध्या गलिच्छ राजकारण केले जात असून वेळोवेळी भाजप आणि राणे कुटुंबीय हे शिवसेनेवर आरोप करून शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर