नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरात रात्री गारठा आणि दिवसा उकाडा अशा विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. शहरात रविवारी (दि. १९) कमाल तापमानाचा पारा १६.२ अंशांवर स्थिरावला. (Nashik Weather )
उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे मागील काही दिवसांपासून गारठ्यात वाढ झाली आहे. पाऱ्यातील घसरणीसोबत नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी तसेच पहाटे हवेचा वेग अधिक असल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. त्यामुळे पहाटे फेरफटका मारण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. मात्र, रविवारी (दि. १९) शहरातील तापमानाच्या पाऱ्यात काहीअंशी वाढ झाली. कमाल तापमानाचा पारा १६ अंशांपलीकडे पाेहोचला. तर किमान तापमानाचा पारा ३१.९ अंशांवर पोहोचला. त्यामुळे दिवसभर हवेत उष्मा जाणवत असल्याने नागरिकांना घामाच्या धारा लागल्या. (Nashik Weather)
नाशिकमध्ये उकाडा जाणवत असताना ग्रामीण भागांतही ठिकठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. निफाडचा पारा १२.५ अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे द्राक्षपंढरी गारठली आहे. तर मालेगाव, चांदवडसह अन्य तालुक्यांमध्येही पाऱ्यातील घसरणीमुळे जनता हैराण झाली आहे. दरम्यान, चालू महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- SBI Recruitment : एसबीआय मध्ये मेगाभरती, लिपिक पदासाठी ८,२३८ जागा
- Nashik News : छटपूजेनिमित्त फुलला गोदाघाट, उत्तरभारतीयांची गर्दी
- Shivani Rangole : शिवानीची सिंगापूर ट्रीप; शॉपिंग अन् खाण्यावर मारला ताव
The post नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा appeared first on पुढारी.