नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं…

शरद पवार, अजित पवार

नाशिक : अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. नाशिकमध्येही छगन भुजबळ व अजित पवार यांच्या समर्थकांचा एक गट व शरद पवार यांच्या समर्थकांचा एक गट असे दोन गट पडले आहेत. आज (दि.4) राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरुन दोन्ही गटात चांगलाच राडा झाला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून यावेळी मोठ्या प्रमाणात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

दरम्यान, छगन भुजबळ व अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बॅनरबाजी करुन कार्यालयाचा ताबा घेतला. त्यावरुन दोन्ही गटात चांगलीच झुंपली आहे. महाराष्ट्रात कोठेही नाही असा अभुतपूर्व गोंधळ येथे पाहायला मिळतो आहे. शरद पवारांचे फोटो असलेले होर्डिंग कार्यकर्त्यांनी गळ्यात घालून कार्यालया बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, अजित पवार गटाचे समर्थकही आक्रमक झाले आहे. यावेळी दंगल नियंत्रक पथकासह पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. दोन्ही गटाच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.

The post नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं... appeared first on पुढारी.