नाशिकमध्ये रुग्‍णसंख्यावाढीचा पुन्हा उच्चांक! दिवसभरात २ हजार ७७९ पॉझिटिव्‍ह

नाशिक : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची गती वाढत असून, सोमवारी (ता. २२) दिवसभरात रुग्‍णसंख्यावाढीने पुन्हा उच्चांक गाठला. दिवसभरात २ हजार ७७९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील तीन व नाशिक ग्रामीणमधील नऊ अशा एकुण बारा जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला.

बाधितांमध्ये महापालिका हद्दीतील सर्वाधिक

दिवसभरात बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या २ हजार ६९६ राहिली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ७१ ने वाढ झाली असून, सद्यस्‍थितीत जिल्ह्यात १६ हजार ९८७ बाधितांवर उपचार सुरु आहेत. सोमवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील सर्वाधिक १ हजार ५४४ रुग्‍णांचा समावेश आहे. त्‍या पाठोपाठ ग्रामीणमधील एक हजार १०१, मालेगावचे १०३ तर, जिल्‍हा बाहेरील ३१ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आलेत. दिवसभरात जिल्ह्यातील २ हजार ६९६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. यामध्ये नाशिक महापालिका हद्दीतील दोन हजार ३००, नाशिक ग्रामीणमधील ३७५, मालेगावच्‍या सात, तर जिल्‍हा बाहेरील चौदा रुग्‍णांचा समावेश आहे. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ५० हजार ९१७ वर पोचली असून, यापैकी १ लाख ३१ हजार ६९८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत २ हजार २३२ रुग्‍णांचा कोरोनाने मृत्‍यू झालेला आहे.

हेही वाचा - भय इथले कधी संपणार? नाशिकमध्ये विवाहितेसह चिमुरडीवर अत्याचार; भयंकर प्रकार 

मृतांमध्ये दोन युवक

दिवसभरात झालेल्‍या बारा मृत्‍यूंमध्ये दोन युवकांचा समावेश असून, पाच ज्‍येष्ठ नागरीक आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये मनमाड येथील २४ वर्षीय व नांदगाव येथील ३५ वर्षीय युवक, तसेच पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील ८० वर्षीय व ७० वर्षीय महिला, बिजोरसे (ता. बागलाण) येथील ६५ वर्षीय महिला, धरणगाव खडकवीर येथील ५१ वर्षीय महिला, मालेगावचे ५४ वर्षीय पुरुष, सटाण्यातील ७३ वर्षीय महिला, येवल्‍यातील ७४ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक शहरातील जेल रोड येथील ६८ वर्षीय महिला, मेन रोडवरील ८४ वर्षीय पुरुष आणि सिन्नर फाटा येथील ७४ वर्षीय महिला बाधिताचा कोरोनामुळे बळी गेला.

चार हजार अहवाल प्रलंबित

सायंकाळी उशीरापर्यंत ४ हजार ०४६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक २ हजार ३८४ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. दरम्‍यान दिवसभरात जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २ हजार ९७७ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी २ हजार ८७७ संशयित नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात नऊ, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात अकरा रुग्‍ण दाखल झाले.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ