नाशिकमध्ये ‘रेमडेसिव्हिर इंजेक्शन’साठी रांगा कायम; वाढत्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा 

नाशिक : भर उन्हात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन घेउन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मेडीकल दुकानांचे उंबरठे झिजविणाऱ्यांना कोरोना बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव आजही सुरु होती. दरम्यान  वाढत्या तक्रारीनंतर आज (ता.७) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी  बाधीतांच्या नातेवाईकांच्या भेटी घेत परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच उपचार सुरु असलेल्या गरजूना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या. 

शहरात इंजेक्शनचा तुटवडा कायम

नाशिक जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजक्शनचा तुटवडा कायम आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुडवड्याबाबत आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आढावा घेत खात्री करुन घेतली. मांढरे यांनी स्वतः रांगेत उभे असलेल्या गरजू रुग्णांच्या नातेवाईकांकडील बाधीत असल्याचे रिर्पोट आणि प्रिस्क्रिप्शन तपासले. 

रेमडेसिव्हीर उपलब्ध करुन देण्याच्या सूचना

रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठीची नागरिकांची वणवण कामय आहे. वाढत्या प्रादुर्भावात रुग्‍णांची अत्यावस्थता वाढत असल्याने रुग्णालयाकडून नानाविध औषधोपचार इंजेक्शनची मागणी केली जाते. त्यापैकी रेमडेसिव्हीर हा एक 
पर्याय सुचविला जातो. सहाजिकच शहरातील मोठ्या संख्येने रुग्णालयाकडून रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी शिफारस केली जात आहे. सहाजिकच भावनाविवश रुग्णांचे नातेवाईक उन्हातान्हात वणवण करीत, मेडीकल दुकानासमोर रांगा लावत आहेत. दोन दिवसांपासून रुग्णांच्या रांगा कमी होईनात. या वाढत्या तक्रारीची दखल घेत, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी करुन रेमडेसिव्हीर उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

कडाक्याच्या उन्हात रांगा लावण्याची नातेवाईकांवर वेळ 

कोरोना बाधीतांच्या रेमेडिसिव्हीर इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन शिवाय दिले जात नाही. डॉक्टरांकडून गरजू रुग्णांसाठी प्रिस्क्रिपशन दिले जाते. म्हणून गरजूंचे नातेवाईकांना दारोदार फिरावे लागते आहे. बंद, जमावबंदी हे सगळे नियम असूनही बाधितांच्या नातेवाईकांना रांगा लावाव्या लागत आहेत. इंजेक्शन थेट रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याची सोय केल्यास, त्यासाठी ऑनलाईन इंजेक्शन मिळण्‍याची सोय झाल्यास, नागरिकांची गर्दी कमी होऊन काळाबाजाराला आळा बसण्यास मदत होईल. मात्र तशी कुठलीच व्यवस्था नाही. त्यामुळे उन्हा-तान्हात रांगा लावण्याची नातेवाईकांवर वेळ आली आहे. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

हे महत्वाचे इंजेक्शन आहे. मी स्वत: रियॅलिटी चेक केले असता असे आढळले की, बरेच लोक प्रिस्क्रिपशन घेतात आणि इंजेक्शनसाठी गर्दी करतात. रेमडेसिव्हिरच्‍या वापराचे काही नियम आहेत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ते दिले जातात. सरसकट सगळ्यांना जे ॲडमिट आहे. तसेच त्यांना गरज आहे. डॉक्टरांनी तसे प्रमाणित केले आहे. अशा उपचार सुरु असलेल्या रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या आहेत. 
- सूरज मांढरे (जिल्हाधिकारी नाशिक)