नाशिकमध्ये ‘रेमडेसिव्हिर’चा तुटवडा; मेडिकलसमोर मोठी गर्दी; पाहा VIDEO

नाशिक : कोविडचा काळ..संचारबंदी आणि दुकानाबाहेर मोठमोठ्या रांगा... ही दृश्य आहेत नाशिकच्या मेडिकल दुकानाबाहेरची....शहरात 'रेमडेसिव्हिर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाला असून हे इंजेक्शन घेण्यासाठी कोरोना रुग्णाचे नातेवाईक (ता.६) रांगा लावत आहेत. यावेळेस सीबीएस येथील पिंक फार्मसी समोर मोठी गर्दी केली आहे. भर उन्हात रेमेडीसिवर इंजेक्शन घेण्यासाठी हे नातेवाईक मोठमोठ्या रांगा लावून उभे असल्याचे चित्र दिसत आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

इंजेक्शन मिळविताना रुग्णांच्या नातेवाइकांची प्रचंड धावपळ

इंजेक्शन निर्मात्या कंपन्यांकडून पुरवठा कमी होत असल्याने, शहर व जिल्ह्यात या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. त्यामुळे हे इंजेक्शन मिळविताना रुग्णांच्या नातेवाइकांची प्रचंड धावपळ होत आहे.गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवरील उपचारादरम्यान 'रेमडेसिव्हिर' इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. त्यामुळे मध्यम ते गंभीर स्वरूपाचा रुग्ण दाखल झाल्याबरोबर लगेच डॉक्टरांकडून 'रेमडेसिव्हिर' इंजेक्शन आणण्याच्या सूचना रुग्णाच्या नातेवाइकांना केल्या जात आहेत. त्यामुळे इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली असून, ते मिळविताना रुग्णांच्या नातेवाइकांना प्रचंड खटाटोप करावा लागत आहे.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी