
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नाकातून देण्यात येणाऱ्या इनकॉव्हॅक लसही पुढील 15 ते 20 दिवसांत उपलब्ध होणार आहे. या लशीला शासनाने मंजुरी दिली असली तरी ही लस केवळ शासकीय रुग्णालयांतून द्यावी की खासगी रुग्णालयांना इनकॉव्हॅक लस देण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यावर शासनस्तरावर निर्णय होणे बाकी आहे.
सद्यस्थितीत कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत असून, पुढील 15 ते 20 दिवसांत कोव्हिशिल्ड लसही शासनाकडून उपलध्य करून देण्यात येणार आहे. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा 28 दिवसांनी घ्यावयाचा आहे. प्रिकॉशन डोस म्हणूनही इनकॉव्हॅक डोस घेता येईल. बूस्टर डोस हा 6 महिन्यांनंतर घ्यावा, असे आवाहन महिला व बालसंगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांनी केले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज 400 लशींचा बूस्टर डोस देण्यात येत आहे. जिल्हावासीयांचे 90 टक्के लसीकरण पूर्ण झालेले असून, ज्यांनी कुणी लस घेतली नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी केले.
हेही वाचा :
- नाशिक : ७५ हजार थकबाकीदारांना मनपाकडून नोटिसा, १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’
- नगर : झेडपीच्या गटांत 350 कोटींची साखरपेरणी !
- मुलाने गिळल्या तब्बल 52 गोट्या!
The post नाशिकमध्ये लवकरच 'इनकॉव्हॅक' लस appeared first on पुढारी.