नाशिकमध्ये लॉकडाउनबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे शुद्धीपत्रक; जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक नियम कडक केले आहेत. त्याअंतर्गत शनिवार व रविवारी लॉकडाउन असणार आहे. मात्र यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट असणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक आदेशाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे, तर काही ठिकाणी पोलिसांकडून अतिरेक होत असल्याच्या तक्रारी आहेत. उपनगरला बुधवारी (ता. ११) सायंकाळी सातला पोलिसांनी चक्क कामावरून घरी चाललेल्या मजुरांना सौम्य छडीमार करून पळविले. सायंकाळी सातला दुकान बंदचे आदेश असल्याचे सांगून जीवनावश्यक वस्तूंसह सरसकट दुकान बंद करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू विक्रीचे दुकानदारही काही भागात त्रस्त झाले आहेत. या सगळ्या गोंधळ आणि संभ्रमावस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुद्धीपत्रक काढले आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

आंदोलनाबाबत यंत्रणेचे स्पष्टीकरण 

-खाद्यगृह, परमिट रूम रात्री नऊपर्यंत सुरू 
-पन्नास टक्के क्षमतेने हॉटेल, बारला मान्यता 
-होम डिलिव्हरी किचन वितरण रात्री दहापर्यंत 
-ग्राहकांची बंदिस्त सोय असल्यास नऊपर्यंत 
-हॉटेल, बार जीवनावश्यक दुकाने शनिवारी-रविवारी सुरू 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO