नाशिकमध्ये लॉकडाऊन तुर्तास टळले; पालकमंत्री भुजबळांचा ८ दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : नाशिकला गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविण्याचा  निर्णय आजच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला.  त्यामुळे पुण्याप्रमाणेच नाशिकला लॉकडाऊन   टळले आहे.  मात्र 2 एप्रिल पर्यंत हे चित्र असेच राहीले तर 2 एप्रिलला लॉकडाऊन अटळ आहे.   

शहर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना आजपासून पुन्हा दुसरा लॉकडाऊन होणार का?  याविषयी नागरिकांमध्ये भीती आहे.  कोरोना रुग्ण वाढत असताना लोकांची गर्दी कमी होत नाही ही प्रशासनाला चिंता आहे. तर पूर्वकल्पना न देता अचानक दुसरा लॉकडाऊन झाले तर गेल्या वर्षाप्रमाणे अडचण झाली तर काय? ही लोकांना चिंता आहे. अशा पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.                        

 लॉकडाऊन  कोणालाच आवडत नाही, त्यामुळे मास्क नसलेल्या लोकांना दुकानात घेऊ नका, अन्यथा आशा दुकानांवर कारवाई होईल इतक्या स्पष्ट  सूचना दिल्या असे भुजबळ म्हणाले. आजच्या बैठकीच्या दोनदा वेळा बदलल्या त्यामुळे लोकांत फेर लॉकडाऊनची भीती वाढत जाऊन भारत बंद असूनही दुपारनंतर लोकांची रस्त्यावर गर्दी वाढत गेली अशा स्थितीत झालेल्या आजच्या बैठकीकडे लक्ष लागले होते.    

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

रुग्णसंख्या वाढीत नाशिक पाचव्या क्रमांकावर

बैठकीनंतर  भुजबळ म्हणाले की, राज्यात रुग्णवाढीत नाशिक हे पाचव्या स्थानी आहे हे चिंताजनक आहे. रुग्णसंख्या 1 महिन्यात 2469 हुन आता 19000 हजार इतकी झाली आहे 19 हजार रुग्णांपैकी नाशिक शहरातील आकडा हा 11000 आहे. तसेच आजपर्यंत नियम न पाळणाऱ्या कडून 30 लाख दंड वसूल केला आहे.  दुसरी लाट आली आहे हे खरे पण ज्यांना वेगळं रहाण्याची सोय नाही अशा रुग्णामुळे संख्या वाढत आहे, खासगी रुग्णालयांची संख्या मनपा आणि पोलिसांना मिळत नाही. होम क्वारंटाइन रुग्णाची संख्या कळतं नाही ही मुख्य अडचण आहे. काही अधिकारी हलत नाही त्यांना दूर हलवू केवळ बदली करून थांबणार नाही तर कडक कारवाई करू अशी कानउघडणी देखील भुजबळ यांनी केली.

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ