नाशिकमध्ये वाडा कोसळला, दोन महिला गंभीर जखमी, 24 तास उलटूनही गुन्हा दाखल नाही

<p>नाशिकमधील&nbsp;वाडा&nbsp;दुर्घटनेप्रकरणी 24 तास उलटूनही गुन्हा दाखल न करण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. काल संध्याकाळी शहरातील घनकर लेन परिसरात असलेला वैश्य&nbsp;वाडा&nbsp;अचानक पत्त्याच्या इमल्याप्रमाणे खाली कोसळला. या दुर्घटनेत वाड्यातील संगीता वैश्य आणि रित्या वैश्य या दोन महिला दुसऱ्या मजल्यावरून खाली खोदलेल्या खोल खड्ड्यात पडल्याने जखमी झाल्या होत्या. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले असून सध्या जिल्हा रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या वाड्याला लागूनच संजय जोशी यांचा&nbsp;वाडा&nbsp;नूतनीकरण करत उभारणीचे काम सुरू होते आणि त्याचेच हादरे बसून वैश्य&nbsp;वाडा&nbsp;कोसळल्याचा आरोप केला जात असून याप्रकरणी पोलिस तसेच महापालिकेकडून अद्याप पावेतो कुठलीच कारवाई केली न गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.&nbsp;</p>