नाशिकमध्ये वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या; समन्वयक नोडल अधिकारी मात्र गायब

नाशिक : कोविडच्या पार्श्‍वभूमीवर समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर दीड महिन्याच्या रजेवर गेल्याने नोडल अधिकारी शोधण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. विशेष म्हणजे आष्टीकर यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात घटना व्यवस्थापक म्हणूनदेखील महत्त्वाची जबाबदारी होती. 

कोरोनासाठी समन्वयक नोडल अधिकारी दीड महिन्यापासून रजेवर 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला सूचना दिल्या आहेत. खाटांची संख्या वाढविणे, ऑक्सिजनचा साठा तयार करणे आदी कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आष्टीकर यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली होती. कोरोनाच्या दुस‍ऱ्या लाटेचा सामना करण्याची जबाबदारी आष्टीकर यांच्यावर आहे. दीड महिना रजेवर गेल्याने कोरोनासंदर्भातील निर्णय घेण्यात अडचण येत आहे. दरम्यान, आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दीड हजाराच्या वर गेल्याने कोरोना संकटाचा सामना करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच