नाशिकमध्ये वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला कंटेनरने चिरडले; जागीच मृत्यू

नाशिक : पेठ रोडवर वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले असल्याची माहिती समोर येत आहे. कुमार गायकवाड असं पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून कंटेनर चालकास पोलिसांनी अटक केली आहे. कंटेनरची जोरदार धडक लागल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आडगावचे उत्कृष्ट कबड्डीपटू लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी कॉलेजचे विद्यापीठ खेळाडू, नाशिक ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेचे कुमार गायकवाड हे कर्तव्यावर असताना पेठ रोडला कंटेनर ने उडविल्याने अपघात होवून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. (सविस्तर वृत्त थोड्याट वेळात)

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल