नाशिकमध्ये विजेचा धक्का लागल्याने दोन शिवभक्तांचा दुर्दैवी मृ्त्यू; घटनेने परिसरात हळहळ

नाशिक रोड : संपुर्ण महाराष्ट्रात आज(ता.१९) शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या जल्लोषपुर्ण वातावरणास विहीतगाव येथे ऐन शिवजयंतीच्या दिवशीच दोन शिवभक्तांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

या बाबत अधिक माहिती अशी की, येथे प्रभाग क्रमांक २२ मध्ये वडनेर रोड वरील राजवाडा कडे जाणाऱ्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक लावलेला होता. गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने हा फलक पडला होता. शुकवारी दुपारी रस्त्याने जाणाऱ्या या युवकांनी पडलेला फलक उचलला आणि उभा केला त्यांना उंचीची अंदाज न आल्याने  वरून जाणाऱ्या वीज ताराचा या फलकाला स्पर्श झालाने  त्याचा विजेचा धक्का लागला.अक्षय किशोर जाधव (वय २६) राहणार वडनेर गाव व राज मंगेश पाळदे (वय २०) राहणार सौभाग्य नगर या तरुण मृत्युमुखी पडले. इतर दोन जण किरकोळ जखमी झाले.

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

घटनेने परिसरात हळहळ

नागरिकांनी या चौघांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले  जाधव व पाळदे यांची प्राणज्योत मावळली होती, वैदयकीय आधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत राज पाळदे हा एकुलता एक मुलगा होता तर जाधव यांच्या पाच्यात दोन भाऊ आहेत. हॉस्पिटलमध्ये  नागरिक, शिवजन्मोउत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गर्दी केली.

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले