नाशिकमध्ये विनामास्क दंडाच्या रकमेत कपात; महापालिका आयुक्तांचा आदेश

नाशिक : कोरोना संक्रमणामुळे नागरिकांवर कोसळलेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करत महापालिका आयुक्तांनी मास्क न वापरणाऱ्यांच्या दंडात कपात केली आहे.

नागरिकांवरील आर्थिक परिस्थितीचा विचार; दंडात कपात

कोरोना संक्रमणामुळे नागरिकांवर कोसळलेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मास्क न वापरणाऱ्यांच्या दंडात आठशे रूपयांची कपात केली आहे. सुधारित आदेशानुसार मास्कविना फिरणाऱ्यांवर एक हजार ऐवजी दोनशे रूपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

एक हजार ऐवजी दोनशे रूपये

पालकमंत्री छगन भुजबळ यांची सुचना तसेच महापालिका आणि पोलिस पथकाकडून प्राप्त झालेला अभिप्राय आणि दंड वसूलीत येणारी अडचण या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आला आहे .दरम्यान , विनामास्क फिरल्यास होणाऱ्या दंडाच्या रक्कमेत कपात करण्यात आली आहे.

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर