नाशिकमध्ये शालिग्राम एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग

शालिमार एक्सप्रेसला आग,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
मुंबईहून बिहारला जात असलेल्या कुर्ला शालिग्राम एक्सप्रेसच्या प्रवासी डब्याला सकाळी ८.४० च्या दरम्यान आग लागली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवित हानी झाली नाही.

नाशिक शालिमार एक्सप्रेसला आग,www.pudhari.news

कुर्ला शालिग्राम एक्सप्रेस शनिवारी सकाळी मुंबईवरून बिहारच्या दिशेने निघाली होती. साधारण ८.५० च्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली. यावेळी शालिग्राम एक्सप्रेसच्या व्हीपीएच म्हणजेच पार्सल भोगीतून धूर येत असल्याचे आरपीएफ जवानांच्या लक्षात आले. त्यांनी शहानिशा केली असता बोगीला आग लागल्याचे स्पष्ट झाले. वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील आरपीएफ जवानांच्या समय सुचकतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. शालिग्राम एक्सप्रेस ही प्रवासी एक्सप्रेस आहे. आगीची घटना ही पार्सल डब्यात घडली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरपूर सिंग यादव हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये शालिग्राम एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग appeared first on पुढारी.