नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का! संजय राऊत यांच्या उपस्थितत वसंत गीते, सुनील बागुल यांचा अखेर पक्षप्रवेश

नाशिक : पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते व सुनील बागूल यांनी आज घरवापसी केली आहे.. त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधत राज्य़पाल नियुक्त आमदारांचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. आमदारांचा राज्यापालांनी घटनेचा खून करू नये असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदार या विषयावर बोलताना या नियुक्त्या न होण हा विधिमंडळाचा अपमान असे राऊत म्हणाले
 

 वसंत गीते,सुनील बागुल परत स्वगृही आले

नाशिक पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याची जबाबदारी या दोघांवर असून गीते,बागुल यांच्या प्रवेशानं कोणतेही मतभेद नसून दोघांचाही भगवी शाल देऊन संजय राऊत यांनी पक्षात स्वागत  केले. सायंकाळी मुंबईत त्यांची जबाबदारी निश्चित होईल तसेच या संदर्भात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठरवतील. तसेच जुने शिवसैनिक पुन्हा परत येत असून पक्षप्रमुखांची यांच्यासोबत वर्षावर बैठक झाली असल्याचे राऊत म्हणाले

नाशकात प्रवाह बदलतोय;  भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर
औरंगाबाद विमानतळ नाव बदलण्याचा ठराव कॅबिनेटनं मंजूर करून केंद्राला पाठवला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ हा प्रस्ताव आहे. काँग्रेस मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक आहे. बिहार मधून देखील औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर करावं अशी मागणी करण्यात आली आहे.यावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी.

ईडी संदर्भात संजय राऊत म्हणाले
- माझ्यावर कोणताही घाव,वार, हल्ला याचा परिणाम होत नाही
- नोटिसा म्हणजे सरकारी कागद
- आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल
- ed आणी cbi मागे लावण्यारांनी लक्ष्यात ठेवावं
- मी विरोधी पक्षांचा सन्मान राखतो
- प्रताप सरनाईक यांना वेगळा न्याय आणी गिरीश महाजन यांना वेगळा का ?

दिल्ली आंदोलन संदर्भात राऊत म्हणाले
दिल्ली आंदोलनात शेतकऱ्यांचे मृत्यू झाले हे केंद्रानं केलेले खून आहेत. राज्यात या आत्महत्यांवर तोडगा निघेल
  

मातोश्री वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश

माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल आज(ता.८)  शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या दोनही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री या दोन नेत्यांनी नाशिक मध्ये खासदार संजय राऊत यांनी दोन तास प्रवेशा संदर्भात चर्चा केली असून त्यांच्या प्रवेशाची आज राऊत पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्री वर आज सायंकाळी ५ वाजता  प्रवेश करणार आहे