नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११ ) सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला.  घटनापीठाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्‍या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्‍यक्ष घेतील, असे स्‍पष्‍ट केले. या निर्णयामुळे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बचावले असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आनंदोत्सव साजरा केला. सत्य परेशान हो सकता है पराजित नही अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. प्रसंगी शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरुवून व फटाके वाजवून जल्लोष केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत आनंद साजरा केला.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, सह संपर्क प्रमुख राजु लवटे, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, उप जिल्हाप्रमुख सुदाम ढेमसे, श्याम साबळे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, प्रमोद लासुरे, महेश जोशी, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख प्रताप मेहरोलिया, बाबुराव आढाव, रोशन शिंदे, सचिन भोसले, आनंद फरताळे, शिवा ताकाटे, योगेश म्हस्के, नगरसेविका सुवर्णा मटाले, संगीता जाधव, मंदाकिनी जाधव, शोभा मगर, श्यामला दीक्षित, अस्मिता देशमाने, शोभा गटकळ, मंगला भास्कर, योगेश बेलदार, महानगर प्रमुख दिगंबर नाडे, दिनेश चव्हाण, उमेश चव्हाण, आदित्य बोरस्ते, आकाश कोकाटे आदींसह शिवसेना, युवासेना कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष appeared first on पुढारी.