नाशिकमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात भारतनगर येथे खून

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क –  भारतनगरला एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली असून बुधवार (दि.१९) रोजी ११:१८ वाजता परवेज शेख ( वय २६) या तरुणाचा खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

खून करणारा मारेकरी मयताचा मित्रच असून आरोपी शेख यास पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेले आहे . तर मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळावरुन चाकू जप्त केला आहे. आरोपी व मयत युवक हे दोघे मित्र होते. दोघांचे मोबाईल विक्री देणे घेणे या विषयावरुन वाद झाल्याने परवेजचा अंत झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यूनिट एकचे कर्मचारी अशोका मार्ग या परिसरात वास्तव्यास आहे. त्यांना परिसरात नागरिकांची गर्दी व झालेल्या घटनेचे वृत्त कळताच लगोलग आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी स्वतः आरोपीला इंटरोगेशन केलेले आहे. पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा: