नाशिकमध्ये हुडहुडी वाढली! कमाल तापमानात घट; आरोग्याच्या समस्येतही वाढ

नाशिक : शहरातील तापमानात काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून, शुक्रवारी (ता.२९) किमान तापमान १०.८ अशांवर पोचल्याने हुडहुडी वाढली आहे. काही दिवसांपासून ३२ अंशावर असलेल्या कमाल तापमानातही घट झाली असून, शुक्रवारी २९ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. दिवसभरातील हवेतला गारठा वाढला आहे.

दिवसभरातील हवेतला गारठा वाढला

गेल्या सोमवारी शहराचे तापमान १०.४ अंश सेल्सिअस होते. तर मंगळवारी अकरा, बुधवारी बारा, गुरुवारी अकरा अंश नोंदविले गेले. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानही खाली उतरत असून, तीन दिवसांत किमान तापमान दोन अंशांनी, तर कमाल तापमान तीन अंशांनी घसरले. थंडीचा जोर वाढल्यामुळे नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. यंदा तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. पुढील काही दिवसांत गारवा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल