नाशिकमध्ये MPSCची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी संतप्त; रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी!

नाशिक : येत्या 14 मार्चला नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा घ्यावी अशी मागणी करताना विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. इतर सर्व परीक्षा सुरळीत होत असताना व दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना कोरोनाचा धोका नाही का? फक्त MPSC परीक्षा आयोजनातच कोरोनाची भीती आहे का अशा संतप्त प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांनी शहरातील रस्त्यांवर येत १४ मार्च रोजी परीक्षा झालीच पाहीजे अशा  घोषणा देत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.