नाशिकमध्ये PSIला 3 लाख रुपयांची लाच घेताना ACBकडून अटक

<p>नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीनं रंगेहात अटक केलीय. नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यानं 4 लाख रुपयांची लाच मागितली होती. आयपीएल मॅचवर बेटिंग सुरु असल्याच्या तक्रारी असल्याचं सांगून त्यानं लाच देण्याची मागणी केली होती. संबंधित व्यक्तीनं याबाबत तक्रार दिल्यानंतर एसीबीनं सापळा रचला आणि शिंदेच्या वतीनं लाच स्वीकारणाऱ्या संजय खराटे याला अटक केली. त्यानंतर एसीबीनं महेश शिंदे यालाही अटक केली.&nbsp; पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे याची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. सातपूर परिसरातील एका खून प्रकरणात त्यानं आरोपींना मदत केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याला याआधी निलंबित करण्यात आलं होतं.&nbsp;</p>