नाशिकरोडला मनसेतर्फे शिवजयंती साजरी

शिवजयंती www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. मनसेचे संतोश पिल्ले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. संतोष पिल्ले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,  छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती मधील सामान्य माणसाला एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. शिवाय न्याय, नीतीच्या बाबतीत देखील भेदभाव केला नाही. आदर्शवत राज्य कसे असावे, याचे उत्तम उदाहरण त्यांनी जगाला दाखऊन दिले. अतिशय खडतर अन् प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याचे संतोष पिल्ले यांनी सांगितले. कार्यक्रमाला नाशिकरोड मनसे विभाग प्रमुख साहेबराव खर्जुल, नाशिक पुर्व विधानसभा अध्यक्ष प्रमोद साखरे, भाऊसाहेब ठाकरे आदी. उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिकरोडला मनसेतर्फे शिवजयंती साजरी appeared first on पुढारी.