नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
महापालिका प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण का करण्यात आली नाहीत, कामे व्यवस्थित पूर्ण झालेली नसताना ठेकेदाराला बिले का अदा केली, असा सवाल करीत धोंगडेनगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले.
विभागीय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिकरोडचे नागरिक रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांचे जीव धोक्यात आले आहेत. प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही होत नाही. खोडदेनगर, पाटोळे मळा, लोणकर मळा, कमला पार्क, प्रधाननगर, सद्गुुरूनगर, मनोहर गार्डन येथील कामांना मंजुरी मिळाली असतानाही ती झाले नाहीत. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अतुल धोंगडे, विकी पाटील, गुरुमित सिंह, चेतन कुलथे, राजू शिंदे, अतुल चव्हाण, आदित्य धोंगडे, यश हरदे, सोनावणे सहभागी झाले होते.
हेही वाचा :
- कस्तुरी क्लब वर्धापनदिन: दररोज 10 हजार पावले चाला; डॉ. अक्षय शिवछंद
- मोठा निर्णय! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती
The post नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन appeared first on पुढारी.