नाशिकरोड कारागृहात कैद्यांची सुरक्षा रक्षकास जबर मारहाण

नाशिकरोड कारागृह,www.pudhari.news

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांनी कारागृह सुरक्षारक्षकास जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. बॅरेक का चेंज केले असा प्रश्न या सुरक्षा रक्षकाने कैद्यांना केला होता, त्यावरुन दहा ते बारा कैद्यांनी मिळून सुरक्षारक्षकास जबर मारहाण केली.

प्रभू चरण पाटील असे मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेले हे कैदी आहे. त्यांनी दगडाने तसेच लाथा बुक्क्यांनी सुरक्षारक्षकास मारहाण केल्याने सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहे.

जखमी सुरक्षारक्षकास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांचा व सुरक्षारक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून अधिक तपास सुरु आहे.

The post नाशिकरोड कारागृहात कैद्यांची सुरक्षा रक्षकास जबर मारहाण appeared first on पुढारी.