नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात 10 कैदी कोरोनाबाधित; तातडीने विलगीकरण कक्षात दाखल

नाशिक रोड : अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगावहून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आठ दिवसांपूर्वी आलेल्या वीसपैकी दहा कच्च्या कैद्यांना करोना झाल्याचे उघडकीस आले.

कोपरगावहून नाशिक जेलमध्ये दाखल झालेल्या दहा कैद्यांना करोना

न्यायालयीन केसेस सुरु असलेले कोपरगावच्या साठ कच्च्या कैद्यांना नगर, पुणे आणि नाशिकच्या कारागृहांमध्ये दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले होते. नाशिकरोड कारागृहात आठ दिवसांपूर्वी वीस कैदी आले होते. त्यांची कारागृहाच्या प्रवेशव्दाराबाहेर कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील दहा कैद्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या सर्वांना जिल्हा व बिटको रुग्णालयात दाखल न करता कारागृहात असलेल्या कोरोना कक्षात ठेवण्यात आले. त्यांच्यावर कारागृहातील डॉ. ससाणे यांनी उपचार केले. औषधे दिली. त्यांना स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारली असल्याची माहिती कारागृहाचे अधिक्षक प्रमोद वाघ यांनी दिली आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ