नाशिकरोड रेल्वेस्थानकावर ‘आओ जावो घर तुम्हारा’! धोका वाढण्याची शक्यता

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर महिनाभरापासून कोरोना चाचण्या बंद आहेत. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा करार संपला आहे. यामुळे कर्मचारीच नसल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशीच गत सध्या नाशिक रोड रेल्वेस्थानकावर झाली आहे. रेल्वे विभागही याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

‘आओ जावो घर तुम्हारा
महिनाभरापासून नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कोरोना चाचण्या बंद आहेत. त्याठिकाणी परराज्यातून येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची तापमान तपासणी व संशयित रुग्णांच्या तपासण्या होत नाहीत. महिनाभरापासून शहरात आलेल्या लोकांच्या चाचण्या झालेल्या नाहीत. यामुळे नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या माध्यमातून नाशिक शहरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

रेल्वे आल्यावर शंभर- दीडशेच्या दरम्यान लोक बाहेर पडतात. त्यामुळे चाचणी करणे शक्य होत नाही. महापालिका कर्मचाऱ्यांचे करार संपल्यामुळे येथे एकच कर्मचारी आहे. 
-आर. के. कुठार, स्टेशन मास्तर 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न