
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन दि. 29 ते 31 ऑगस्टदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. हे संमेलन तब्बल 20 वर्षांनंतर नाशिकमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजित संतभोजनाप्रसंगी करण्यात आला.
नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर मंगळवारी (दि. 16) सकाळी मान्यवरांच्या हस्ते संमेलन स्थळाचे पूजन पार पडले. त्यानंतर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या निवासस्थानी संतभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आचार्य प्रवर सुकेणकर बाबा शास्त्री, आचार्य प्रवर चिरडे बाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुकेणकर शास्त्री म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात महानुभाव संमेलन 2002 मध्ये झाले होते. त्याचे यशस्वी नियोजन दत्ता गायकवाड यांनी केले होते. यंदा माजी नगरसेवक दिनकर पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड यांच्यासह अनेक नेते मंडळी संमेलन यशस्वी करतील, असा विश्वास बोलून दाखविला. महंत कृष्णराज मराठे म्हणाले की, संमेलनाप्रसंगी देशातील अनेक राज्यांतून साधू, महंत येणार आहेत. त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. यावेळी निवृत्ती अरिंगळे, भास्कर सोनवणे, भास्कर गावित, पुंजाभाऊ सांगळे, प्रभाकर भोजने, विश्वास नागरे, राजेंद्र जायभावे, प्रकाश ननावरे, नंदू हांडे, अरुण महानुभाव, अनिल जाधव, कुमार गायकवाड, अशोक सातभाई, सुधाकर जाधव, दिनकर आढाव आदी उपस्थित होते. अरुण महानुभाव यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश घुगे यांनी आभार मानले.
देशभरातून भाविक येणार : संमेलनासाठी दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतून साधू, महंत, भाविक येणार असल्याचे दत्ता गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा :
- ठाणे : शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या दोन वयोवृद्ध आजींची फसवणूक; एक लाखाचा ऐवज लुटला
- अब तांडव होगा…कंबोज यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ
- खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा 99 टक्क्यांवर
The post नाशिकला वीस वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार appeared first on पुढारी.