गोदावरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 7) सर्वदूर संततधार पाऊस झाला. नाशिक शहर व परिसराला पावसाने झोडपून काढले असताना, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. इगतपुरी, र्त्यंबकेश्वर, दिंडोरीसह अन्य काही तालुक्यांत जोरदार सरींमुळे बळीराजा सुखावला आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

नाशिक : वरुणराजाने दिवसभर जोरदार हजेरी लावल्याने शहरात रस्ते असे जलमय झाले.(छाया : हेमंत घोरपडे)

जून महिना कोरडाठाक गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने नाशिकमध्ये दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर जोरदार सरी बरसत आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा जोर चांगला असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. शुक्रवारी (दि. 8) पहाटेपासून नाशिक शहर व परिसरात पावसाचा जोर वाढला. सलग पावसाने शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले, तर शहरातून वाहात येणार्‍या पाण्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. सोमेश्वर येथील धबधबा दुथडी भरून वाहू लागला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकसह जिल्ह्यात संततधार ; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ appeared first on पुढारी.