नाशिकहून तिरुपती, पुद्दुचेरीला कनेक्टिंग फ्लाइट, पोहोचता येणार अवघ्या पाच तासांत

विमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे नाशिकहून वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असलेली विमानसेवा बंद पडली होती, आता ती हळूहळू पूर्ववत होत असून, नाशिककरांना तिरुपती व पुद्दुचेरीसाठी आता कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्पाइस जेटकडून ही विमानसेवा सुरू करण्यात आली असून, नाशिककरांना अवघ्या पाच ते सहा तासांत तिरुपती, पुद्दुचेरी गाठता येणार आहे. दरम्यान, येत्या 22 जुलैपासून नाशिक ते हैदराबाद, तर 4 ऑगस्टपासून नाशिक ते दिल्ली विमानसेवेला सुरुवात होत आहे.

ध्या नाशिक विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीची अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, नवी दिल्ली व बेळगाव या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. आता ‘स्पाइसजेट’कडून हैदराबादसाठी 22 जुलैपासून, नवी दिल्लीसाठी 4 ऑगस्टपासून सेवा सुरू होत आहे. या सेवेसाठी प्रवासी नोंदणीला 6 जुलैपासून प्रारंभ झाला असून, नाशिक-हैदराबादसाठी 3,700 रुपये, तर नाशिक-दिल्लीसाठी 6,109 रुपये भाडे आहे. नाशिक-हैदराबाद सेवा शनिवार वगळता आठवड्याचे सहा दिवस, तर नाशिक-नवी दिल्ली सेवा रोज उपलब्ध असणार आहे.

‘स्पाइसजेट’ने यापैकी नाशिक-हैदराबादला तिरुपती व पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. नाशिकहून सकाळी 8.10 वाजता उड्डाण घेणारे विमान 9.40 वाजता हैदराबादला पोहोचणार आहे. तेथून दुपारी 12.55 वाजता तिरुपतीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, ती दुपारी 2.05 वाजता तेथे पोहोचेल. तर दुपारी 11.50 वाजता पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, ती दुपारी 1.30 वाजता तेथे पोहोचेल. तूर्त ही सेवा एकेरी असली, तरी लवकरच ती दुहेरी सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिक-हैदराबाद सेवेचा आयटी, उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे, तर तिरुपती व पुद्दुचेरी कनेक्टिव्हिटीचा भाविक, पर्यटकांना लाभ होणार आहे. तसेच नाशिक-हैदराबाद ही सेवा दुहेरी असून, त्यामुळे दक्षिण भारतातून शिर्डी, त्र्यंबकेश्वरला भाविकांची आवक वाढण्याचीही शक्यता आहे.

नाशिकहून सकाळी 8.10 वाजता उड्डाण; 9.40 वाजता हैदराबादला पोहोचेल; दुपारी 12.55 वाजता तिरुपतीसाठी कनेक्टिंग फ्लाइट. ते दुपारी 2.05 वाजता तेथे पोहोचेल. तर दुपारी 11.50 वाजता पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, ते दुपारी 1.30 वाजता तेथे पोहोचेल.

शिंगणापूर उपसा केंद्राला पुराच्या पाण्याचा वेढा

आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी
येत्या 4 ऑगस्टपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. नवी दिल्लीहून सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी नाशिककडे विमान उड्डाण घेणार असून, दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी पुन्हा रवाना होणार आहे. ते तेथे 4 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल. या सेवेला ‘स्पाइसजेट’ आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाईल.

तिरुपती, पुद्दुचेरी विमानसेवेचा नाशिककरांना मोठा फायदा होणार आहे. आयटी उद्योगांसह धार्मिक पर्यटनही वाढणार आहे. या दोन्ही शहरांना धार्मिक महत्त्व असून, नाशिकही धार्मिकदृष्ट्या जगभरात प्रसिद्ध आहे. अशात दोन्हीकडच्या भाविकांना या सेवेचा लाभ होणार आहे.
– मनीष रावल, आयमा एव्हिएशन कमिटीप्रमुख

हेही वाचा :

The post नाशिकहून तिरुपती, पुद्दुचेरीला कनेक्टिंग फ्लाइट, पोहोचता येणार अवघ्या पाच तासांत appeared first on पुढारी.