
नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
अवकाळी पावसाने झोडपूनदेखील तग धरून असलेल्या दिमाखात उभे असलेल्या अंकुर सीड्सच्या ‘श्री-101’ भाताच्या वाणाची प्रत्यक्ष पाहणी शनिवारी (दि.5) पिंपळगाव मोर येथे सकाळच्या सत्रात प्रगतशील शेतकरी रमेश बेंडकोळी यांच्या शेतावर आयोजित केली होती.
अनेक कंपन्या दावे करत असल्या तरीही अंकुर सीड्सच्या बियाण्यांची गुणवत्ता प्रत्यक्ष शेतकरी बांधवांसमोर आणली असल्याचे अंकुरचे प्रतिनिधी जयदीप डोईफोडे यांनी सांगितले. इगतपुरी-घोटी शहरात खरीप हंगामाच्या लागवडीला जवळपास 70 टन बियाण्यांची विक्रमी विक्री झाली असून, तालुक्याच्या सर्वच भागात शेतकर्यांनी लागवड केलेली आहे. लहान दाणेदार लोंबी, मजबूत काडी, आणि भरघोस उत्पादन असणार्या वाणास शेतकर्यांनी पसंती दिली आहे.
पेरणीपासून 135-140 दिवसांत काढणीयोग्य वाण असून, एका लोंबीस साधारण 400 दाणे येतात. एकरी श्री-101 भाताचे 20 ते 22 पोते पीक उत्पादन येत असायचे. कंपनीकडून शेतकर्यांना संबोधित करताना सांगितले. यावेळी रमेश बेंडकोळी, हरी भवारी, मुरलीधर गातवे, दत्तू बेंडकोळी, राजाराम काळे, श्याम कुलाळ, मदन बेंडकोळी, चंद्रकांत बेंडकोळी, एकनाथ कुंदे, सुदाम बेंडकोळी आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी कंपनीकडून श्री-101 वाणाची लागवड करणार्या शेतकर्यांचा कंपनीकडून सत्कार करण्यात आला.
हेही वाचा:
- नाशिक : सुपर 50 सीईटी-जेईईसाठी 12 नोव्हेंबरला प्रवेशपूर्व निवड चाचणी
- रस्तेप्रश्नी उद्योजकांच्या संघटना आक्रमक; चाकणमधील समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
- नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
The post नाशिक : अंकुर सीड्सच्या श्री-101 भातवाणाची पीकपाहणी appeared first on पुढारी.