नाशिक : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या युवकाचा मृत्यू

मृत्यू,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अजय मोहन धोत्रे (२०, रा. हिरावाडी पुलाजवळ) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय याने २४ जून रोजी हिरावाडी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ रात्री नऊच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होेते. त्यात तो गंभीररीत्या भाजला. अजय यास त्याचा भाऊ विकास याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान अजयचा रविवारी (दि.३) सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.