सिडको : पुढारी वृत्तसेवा : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच दत्तनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या तसेच गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे असणाऱ्या नवनाथ उर्फ डॉलर साळवी (वय २४, रा. आंबेडकर नगर, चुंचाळे) या सराईतावर एनपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
संशयित साबळे यांच्याकडून एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीतील दत्तनगर, कारगिल चौक, अंबड चुंचाळे तसेच एमआयडीसी परिसरात विविध भागात दहशत माजवणे, मारहाण, जबरीचोरी, घरफोडी, बलात्कार यासह विविध गंभीर स्वरूपाचे ९ गुन्हे दाखल होते. मागील काही महिन्यांपूर्वी साळवी हा तडीपार असताना देखील त्याने शहरात येऊन जबरी चोरी केली होती. यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सराईत गुन्हेगाराची पार्श्वभूमी लक्षात घेत एमआयडीसी पोलिसांकडून एमपीडीएसचा प्रस्ताव मागील महिन्यात आयुक्तालयाला पाठवण्यात आला होता. यानंतर प्रस्ताव मंजूर होऊन सराईत साबळे याला आता एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा
- नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले
- नाशिक : चाळीत लावलेला शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला
- नाशिक : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसचे उपोषण
The post नाशिक : अंबडच्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई appeared first on पुढारी.